अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी

  • Ganesh Kamjavlge (Hokarna)
  • Upadted: 23/09/2020 9:38 AM

गणेश कामजवळगे जळकोट:- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी 

सोमवार ( दिनांक २१ सप्टेंबर ) रोजी सायंकाळी सात वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत उदगीर तालुक्यातील

नागलगाव मंडळात १३१ मी. मी. आणि नळगीर मंडळात १२० मी. मी. इतकी अतिवृष्टी झाली. या ढगफुटी मुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. सोयाबीन , उडीद आणि ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या अस्मानी संकटामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाने आमच्यासोबत येऊन पाहणी करावी असे मंगळवारी सकाळी मी प्रशासनाला सुचविले. तेव्हा तात्काळ उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी साहेब , तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब यांनी लगेच होकार देत अतिवृष्टी झालेल्या नागलगाव , कासराळ , सुमठाणा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी प्रशासनातील मंडळ अधिकारी , कृषी सहाय्यक , तलाठी , शेतकरी उपस्थित होते. 

      पालकमंत्री अमित भैया देशमुख , राज्यमंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत असे निर्देश दिलेले आहेत. अस्मानी संकटात कोसळलेल्या शेतकऱ्यांना महाविकासआघाडी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रयत्नशील राहील.

Share

Other News

ताज्या बातम्या