ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू!


  • रिजवान मकानदार (Latur)
  • Upadted: 9/23/2020 12:42:50 AM

लातूर:
          कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदराचे प्रमाण लातूर शहरात झालेले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, इन्सुलिनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

यापुढे ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास राज्य सरकारविरोधात ३०२ कलमानुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला.

भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गांधी चौकात मंगळवारी (दि. २२) व्यापक धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

आंदोलनात भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रीत सदस्य माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,

भाजपाचे  माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजपा मीडिया पॅनालिस्ट प्रेरणाताई होनराव, माजी उपमहापौर देविदास काळे, ज्योतिराम चिवडे, सूर्यकांतराव शेळके, सूर्यभान पाटील, निळकंठराव पवार, आदींचा सहभाग होता.

Share

Other News