ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

ठाणे : चांगली कामगिरी गुन्हे शाखा ,ठाणे युनिट -2, लोहमार्ग मुंबई*


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 9/22/2020 7:58:32 PM

*चांगली कामगिरी*
*गुन्हे शाखा ,ठाणे युनिट -2,  लोहमार्ग मुंबई*

*कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 67/2020 , कलम 188, 269,34 भा.द.वि. सह  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 (ब), 52, 54 सह भा रे का कलम 147, 153, 156 गुन्ह्याचा समांतर तपास मा. वरिष्ठांचे आदेशानुसार गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई करत होते, सदरचा गुन्हा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून झालेला असल्याने सामाजिक दृष्टीने संवेदनशील होता तसेच आरोपी अटक करणे हे  लोहमार्ग पोलीसा साठी आव्हानात्मक व प्रतिष्ठचे होते. 
       सदर गुन्ह्याचे तांत्रिक तपास व खास बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या बातमीवरून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी 
1) संदीप सुधाकर देशपांडे, वय 47 वर्षे, राह, दादर मुंबई
2) संतोष बाळकृष्ण धुरी, 50 वर्षे, राह, प्रभादेवी, मुंबई
3) गजानन श्रीकृष्ण काळे, वय 41 वर्षे, राह, नेरुळ, नवी मुंबई 
4) अतुल परशुराम भगत, वय 53 वर्षे, राह, उरण, रायगड
हे चारफटा कर्जत येथे येणार असल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली असता वपोनी/ उत्तम सोनवणे यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे सपोनि/ साठे, पोंशी/ बडेकर, पोशी/ माने, पोशी/ कोळसे, पोशी/ मागाडे यांनी सदरची बातमी वरिष्ठांना सांगून चारफाटा, कर्जत येथे सापळा रचला असता सदरचे आरोपी हे मिळून आले, सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

               

Share

Other News