जागेची मालकी रेल्वेची का मनपाची, बरेचसे प्रश्न अनुत्तरीत, मनपाने स्पष्टीकरण देण्याची गरज : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/02/2026 4:57 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त साहेबांनी विश्रामबाग येथील खोकी काढण्यात आली आहेत त्याबाबत मत मतांतरे आहेत जागेची मालकी रेल्वेची आहे का महापालिकेची आहे..? काही खोकीधारकांना न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता..? असे बरेचसे प्रश्न आहेत 
तर दबक्या आवाजात शेजारी आजूबाजूला मोठमोठे मॉल झालेले आहेत व आणि इमारती होत आहेत त्यांच्या पार्किंगसाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी सुद्धा सदर जागा वापरण्यात येणार आहे..?
अतिक्रमण काढली पाहिजेत त्याबाबत कोणाचेही दुमत नाही मात्र सर्वसामान्यांची अतिक्रमणे काढून धनदांगड्यांची सोय करायची भूमिका असेल तर मात्र अन्यायकारक कारवाई वाटते ..
सदर ठिकाणी अमली पदार्थ मिळत होते असे काही समाज माध्यमातून ऐकण्यात येते ते सुद्धा चुकीचा आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे 
आता त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून कंपाऊंड घालण्याचं काम चालू आहे असे सुद्धा कळते त्यामुळे महापालिकेने सदर जागेच्या बाबत सर्व वस्तूस्थिती जाणून घेऊन जागा ताब्यात घ्यावी 
जुन्या सांगली मिरज रेल्वे रूटवर त्या ठिकाणी रेल्वे तिकीट खिडकी व स्टेशन मास्तरांची ऐतिहासिक खोली होती असे संशोधक कुमठेकर साहेब यांचा लेख वाचला याबाबत सुद्धा महापालिकेने रेल्वे प्रशासनाने खुलासा करावा 
अशी विनंती आहे 
तसेच डीपी मध्ये सदर ठिकाणी 45 फुटी रोड आहे असे कळते त्यावरचे अतिक्रमण काढले आहे तर त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे याची तजवीज माननीय आयुक्त व महापालिकेने करावी अन्यथा त्या ठिकाणी पार्किंग करून कोणाची तरी सोय करू नये अशी माफक अपेक्षा आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या