सांगली: शहरातील विविध भागांतील उघड्या आणि धोकादायक गटारींमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. वारंवार सूचना देऊनही महापालिकेचा बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर तातडीने या गटारींवर झाकणे बसवली नाहीत, तर लोकहित मंच, सांगलीच्या वतीने महापालिकेच्या बांधकाम विभागासमोर 'धोकादायक गटरीचे प्रदर्शन' भरवून अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे. या परिसरातील गटारी बनल्या मृत्यूचा सापळा: शामराव नगर - म्हसोबा मंदिर समोर तरुण भारत व्यायाम मंडळ - संदेश रोड समोर सांगली सिटी पोस्ट - स्टेशन रोड समोर सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे - परिवार बेकरी जवळ विश्रामबाग - स्फूर्ती चौक, आठवी गल्ली समोर शहरातील या प्रमुख ठिकाणी गटारींची अवस्था अत्यंत दयनीय असून त्या नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. "एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच महापालिका प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल मनोज भिसे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाल