भगूर नगरपरिषदेचा शताब्दी समारोह महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/01/2026 7:11 AM

भगूर नगरपरिषदेने शहरातील सांस्कृतिक उत्साह वाढविताना शताब्दी समारोह महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 24 जानेवारी 2026,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केले . मा. नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे व उनगराध्यक्ष श्री. प्रसाद अंबादास आडके तसेच उपस्थित सन्मानीय नगरसेवक नगरसेविका यांच्या दीपप्रज्वलन करून सदर कार्यक्रम सुरुवात करण्यात आले.सदर कार्यक्रमात मा. नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी शुभेच्छा संदेश देताना उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून सर्वाना सोबत घेऊन विकासकामे करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य आणि लोककला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शताब्दी समारोह महोत्सवात शहराच्या विकासात योगदान देणारे सन्मानीय नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,नगरसेवक , नगरसेविका, यांचा गौरव मा. मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक यांना गौरविण्यात आले.मा. नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे व उपनगरध्यक्ष श्री. प्रसाद अंबादास आडके व नगरसेवक, नगरसेविका यांच्या हस्ते शताब्दी समारोह च्या अंतर्गत शालेय स्तरावर आयोजित स्पर्धा मधून विजेत्या विध्यार्थ्यांना पारितोषिक चे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल,नगरसेवक, नगरसेविका, भगूर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शहरातील सांस्कृतिक वातावरण समृद्ध झाले असून, भविष्यात असे अधिक कार्यक्रम घेण्यात येतील.
असे आपल्या शुभेच्छा संदेशात नगराध्यक्षा मा. प्रेरणा विशाल बलकवडे यांनी सूचित केले.

Share

Other News

ताज्या बातम्या