वसगडे येथील रेल्वे उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद...
मात्र सांगलीतील चिंतामण नगर रेल्वे उड्डाण पुल तयार होऊन वर्षे होत आल मात्र अजून सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली नाही नेमकी काय भानगड आहे.
सदर पुलावरून सगळे आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी प्रवास करतात सर्व इच्छुक नगरसेवक प्रवास करतात
आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे
प्रशासन तर आता रील स्टार च्या वर रील करून कामाची प्रसिद्धी करत आहेत मग चिंतामण नगर पुलावरील अंधाराबाबत जिल्हा प्रशासकीय अधिकारी कधी रिली करतील याचीच उत्सुकता सांगलीकर यांना लागलेली आहे.
लवकरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी रीलस्टार स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.. त्यात चिंतामण नगर रेल्वे उड्डाण पुलावरील रिलला प्राधान्य देण्यात येणार आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.