भव्य लोकार्पण सोहळा..!!
महाराष्ट्रातील पहिला २१ फूट उंच असणारा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी इतिहासातून नवीन पिढीला सदैव प्रेरणा मिळत राहावी म्हणून या सांगलीकरांच्या भावनेतून जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य ऐतिहासिक लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी १८.५८ कोटी रुपये इतका निधी मंजूर असलेल्या ०५ नवीन ३३/११ KV उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार असून त्याचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महावितरण तर्फे सर्व मंजूर उपकेंद्रांची कामे वेळेत तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाने व पारदर्शने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून महानगरपालिका क्षेत्रातील वीज पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि भविष्याभिमुख बनेल.
यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासक, प्रशासकीय अधिकारी, भाजपा प्रमुख नेते, भाजपा पदाधिकारी, पुतळा समिती पदाधिकारी व सदस्य, माजी नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ केंद्रप्रमुख, कार्यकर्ते आदी समस्त सांगलीकर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.