धोकादायक बनलेल्या जिल्हा परिषद इमारतीकडे लक्ष द्यावे तर त्रिकोणी बागेत दिवसाही लखलखाट...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2025 2:23 PM

*जिल्हा परिषद इमारतीमधील स्लॅब चे प्लास्टर काल कोसळल्याने जिल्हा परिषद इमारत नागरिकांसह कर्मचाऱ्यांसाठी  धोकादायक ठरत असल्याचे जाणवत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही ही इमारत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले असतानाही या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,आमदार, खासदार यांनी याकडे ताबडतोब लक्ष घालून इमारती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व कर्मचारी आणि नागरिकांचा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या  वतीने करत आहोत*

*सांगली मधील त्रिकोणी बागेमध्ये आणि परिसरात भर दिवसा स्ट्रीट लाईट लागून राहत आहेत. याकडे ताबडतोब महानगरपालिका प्रशासन तसेच महावितरण कंपनीने लक्ष घालण्याची गरज आहे*


 *मनोज भिसे-अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या