क्यु आर कोड अडचणीचे, काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/10/2025 7:06 AM

सां.मि.कु. शहर महानगरपालिके तर्फे कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना कचरा संकलन केल्यानंतर प्रत्येक घरावरील क्यूआर कोड स्कॅन करण्यासंबंधीत आदेश देण्यात आले आहेत. 
सर्व घरातील कचरा संकलित व्हावा या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय चांगला असला तरी वाहनांची संख्या कमी असल्याने या निर्णयाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
प्रत्येक घरासमोरील क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त वेळ वाया जाऊन कचरा संकलन कामाची गती यामुळे नक्कीच कमी होईल. 
याबाबत आज मा. आयुक्त श्री. सत्यम गांधी साहेब आणि मा. अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल रोकडे साहेब यांना भेटून निवेदन दिले. 
यावेळी माजी नगरसेवक श्री. मयूर पाटीलजी, श्री. फिरोज पठाणजी, श्री. तौफिक शिकलगारजी तसेच श्री. विपुल केरिपाळेजी आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या.

Share

Other News

ताज्या बातम्या