माणुसकीचे कर्तव्य, आयुष हेल्पलाईन रेस्कू टीम च्या पाठीवर जिल्हाधिकारी यांचेकडून कौतुकाची थाप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/09/2025 9:39 AM

काल आपल्या सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आयुष हेल्पलाईन टिम, कृष्णा रॉयल बोट, स्पेशल रिस्क्युटिम, हेल्पलाइन इमर्जन्सी रिस्क्युटिम, आपत्ती सदस्य सोलापूर येथील मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आणि अपर तहसीलदार (मंद्रुख) श्री. सुजीत नरहरे यांनी विशेष भेट दिली. त्यांनी आपल्या टीमच्या कार्याचं कौतुक केलं व प्रत्येक सदस्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. 🙏

सांगलीहून आलेली आपली टीम गेल्या 7 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात शेकडो नागरिकांना मदतीचा हात देत आहे.
🚤 पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं,
🥖 अन्न, पाणी व औषधं गरजूंपर्यंत पोचवणं,
👐 आणि धोकादायक ठिकाणी मदतकार्य करत जनतेच्या मदतीस धावून जाणं – ही आपल्या टीमची नित्याची जबाबदारी झाली आहे

केवळ एक सेवा नाही, ही माणुसकीची ओळख आहे.
कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय, "आपलं कर्तव्य" समजून हे कार्य सुरू आहे. संकटाच्या काळात माणूस म्हणून दुसऱ्या माणसासाठी उभं राहणं – हाच आमचा खरा धर्म आहे.

आपण सगळे मिळूनच हा अंधार दूर करू शकतो.
मदतीचा एक हात पुढे करा, कुणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.

सांगली आपत्ती व्यवस्थापन आयुष हेल्पलाईन टिम, कुष्णा रॉयल बोट, स्पेशल रिस्क्युटिम, हेल्पलाइन इमर्जन्सी रिस्क्युटिम, आपत्ती सदस्य टीम यासाठी अहोरात्र झटत आहे.
हे कार्य तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि विश्वासातूनच शक्य होत आहे.
धन्यवाद सोलापूर, आम्ही तुमच्या सोबत आहोत!

Share

Other News

ताज्या बातम्या