मध्य रेल्वेची 126 वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यामध्ये सांगली,कोल्हापुर व सातारा जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने गांधीनगर,रुकडी व ताकारी येथे कोयना व महाराष्ट्र एक्सप्रेला थांबे देण्याचे ठरले
त्याचप्रमाणे कोल्हापुर अहमदाबाद एक्सप्रेस व हुबळी पुणे वंदेभारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले.
याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगितले
कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस चा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले
लवकरच सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे व कोल्हापुर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जयसिंगपुर येथे कोल्हापुर तिरुपती कोल्हापुर हरिप्रिया एक्सप्रेसला थांबा देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
सांगली परळी एक्सप्रेस सध्या डेमु एक्सप्रेस म्हणून धावते त्याऐवजी आय सी एफ कोच ने सोडण्याच्या मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते.