भारतात ‘क्लिनिकल ट्रायल’च्या टप्प्यात 3 लसी: ICMR

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 16/09/2020 12:31 PM


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारतात तीन लसी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती दिली आहे.
      डॉ. बलराम भार्गव म्हणाले..:
▪️ पहिल्या टप्प्यातील चाचण्या भारत बायोटेक आणि कॅडिला यांनी पूर्ण केल्या आहेत. फेज 2 B3 चाचणी सिरम इन्स्टिट्युटने पूर्ण केली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सिरमने सुरुवात केली आहे.
▪️ युरोपातील काही देशांमध्ये तसेच अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लाट आल्यानंतर त्यानंतर ती हळूहळू कमी झाली. मात्र तिथे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली.
▪️ आपण यातून शिकले पाहिजे. आपल्याकडे कोरोनाची पहिली लाट आल्यावर लॉकडाऊनची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. अन्यथा आपल्याकडे किती मृत्यू झाले असते हे सांगता नसते आले.
 दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे चांगल्या उपाय योजना केल्याने कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात पसरला नसल्याचेही डॉ. भार्गव यांनी नमूद केले.

Share

Other News

ताज्या बातम्या