ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

​‘सुदर्शन टीव्ही’वरील ‘बिंदास बोल’ कार्यक्रमावर निर्बंध

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 9/16/2020 12:08:41 PM

‘सुदर्शन टीव्ही’वरील ‘बिंदास बोल’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या उर्वरित भागांच्या प्रसारणास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मनाई केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर या कार्यक्रमाचा एक भाग 10 सप्टेंबरला प्रसारित करण्यात आला होता.
 ‘नोकरशाहीमध्ये मुस्लिम समाजाच्या घुसखोरीच्या कारस्थानचा भांडाफोड’ अशी जाहिरातबाजी करणारा ‘सुदर्शन टीव्ही’वरील हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला आहे.
      न्यायालयाने दिले निर्देश-
"आतापर्यंत प्रसारित झालेल्या या भागातून या कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट दिसतो. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत हा कार्यक्रम प्रसारित करू नये. याआधी 28 ऑगस्टला न्यायालयाने प्रसारणबंदीस नकार दिला होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्वयंनियमनासाठी 5 नामवंतांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या दर्जाबाबत मानके निश्चित करेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 या प्रकरणावर न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेवर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
 दरम्यान, "बिंदास बोल’ हा कार्यक्रम कावेबाज आहे. एखाद्या समाजाबद्दल असे चित्र कसे रंगवले जाऊ शकते? मुक्त समाजात हे सहन केले जाऊ शकते?" असे सवाल न्या. चंद्रचूड यांनी ‘सुदर्शन टीव्ही’च्या वकिलांना विचारले.

Share

Other News