भंडारा जिल्ह्यात आज 133 रुग्णांना डिस्चार्ज तर 142 पॉझिटिव्ह व 03 मृत्यू

  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 15/09/2020 7:34 PM

●पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3102

●बरे झालेले रुग्ण 1831

●क्रियाशील रुग्ण 1203

●आज 03 मृत्यू

●एकूण मृत्यू 68

जिल्हा प्रतिनिधी भंडारा :- लक्ष्मण फुंडे

भंडारा दि. 15सप्टेंबर :- जिल्ह्यात आज 133 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 142 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 3102 झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1831 झाली आहे.

   कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 75, साकोली 00, लाखांदूर 09, तुमसर 25, मोहाडी 15, पवनी 07 व लाखनी तालुक्यातील 11 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 1831 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 3102 झाली असून 1203 क्रियाशील रुग्ण आहेत. आज 03 रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 68 झाली आहे. 

   आज 15 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 155 व्यक्ती भरती असून 1631 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20387 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 2430 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 17957 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या