परतवाडा (जि.अमरावती): महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत 2023 24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार जाहीर, समाजाचे निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. राज्य शिक्षण पुरस्कार योजना 1962-63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून ती शालेय शिक्षण विभागा मार्फत राबविली जाते सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार या नावाने राविण्यात येत आहे दिनांक 13 जून 2011 च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराचे रक्कम रुपये दहा हजार रुपये अदा करण्यात येते तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना चार सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये एक लाख रुपये अदा करण्यात येते.
सन 2023- 24 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय 109+1* शिक्षकांची निवड केली आहे. यात अमरावती जिल्ह्यातील 4 शिक्षकांची निवड झालेली आहे. प्राथमिक शिक्षकांमधून श्री कृष्ण चंदू चव्हाण सहा. शिक्षक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा (हिं) पंचायत समिती धामणगाव रेल्वे, माध्यमिक शिक्षकांमधून श्री शरद वसंतराव गढीकर सहा. शिक्षक चंद्रभांजी विद्यालय कुंड सर्जापूर तालुका जिल्हा अमरावती, आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक श्री प्रमोद रमेशराव दखने सहा. शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचखेडा तालुका चिखलदरा , आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती सुनिता शालिग्रामजी लहाने सहा. शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोणा पोस्ट खैरी ता. अचलपूर जिल्हा अमरावती यांचे निवड झालेली आहे. सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने अभिनंदन.