*मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येते*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 29/03/2024 9:37 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

*लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी*
*मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येते*
सातारा दि.   :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदारांना फोटोसह मतदार ओळखपत्र देण्यात आले आहे.  मतदान ओळखपत्र मतदान केंद्रावर ओळखण्यासाठी फोटोसह सादर करावे.  ज्या मतदारांना मतदाराचा फोटो असलेले मतदार ओळखपत्र सादर करता येत नाही ते मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त विविध कागदपत्रे सादर करून मतदान करू शकतात, असे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारताचे रजिस्ट्रार जनरल, भारतीय यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत अंमलात आणलेले स्मार्ट कार्ड यांचा समावेश आहे.  पासपोर्ट, फोटोसह पेन्शनची कागदपत्रे, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिलेले सार्वजनिक मर्यादित सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र, सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेले विशेष अपंगत्व प्रमाणपत्र  भारतातील मतदार लोकसभा-2024 साठी मतदान करू शकतात, अशी माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या