अग्निशमन विभागाच्या तत्परतेने रघुवीर बेकरीला लागलेले आग आटोक्यात, मोठा अनर्थ टळला...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2024 8:20 AM

लाखो रुपयांचे  आणि जीविताचे नुकसान होण्यापासून वाचले 

आज दि २८/३/२०२४ रोजी सायंकाळी सुमारे ७:०५  वाजता रघुवीर बेकरी किचन मध्ये आग लागली सदरच्या व्यवसाय ठिकाणी तिन्ही बाजूने लोखंडी पत्रे यांनी बंदीस्त आणि  दर्शनी भागात विक्रीसाठी असलेल्या भागाच्या माल सिलिंग मधून आग पसरलेली आणि बेकरी मध्ये वापरातील  ७ LPG गॅस भरलेले  सिलेंडर ,केव्हाही मोठा  स्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती होती.

 अग्निशमन विभागाकडील जवान तात्काळ  घटनास्थळी पोहचून उपलब्ध इन्स्ट्रुमेंट ने  पत्रा कापून  ,आगीवर  पाणी मारून आग शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली    आत मधील  ७ गॅस  टाक्या बाहेर काढण्यात आल्या 
त्यामुळे बेकरी पुढील भागांमध्ये आग पसरली नाही. त्यामुळे लाखो रुपये आणि जीविताची हानी टाळली आहे , अग्निशमन दलाचे  नागरिकांनी अभिनंदन केले आहे,
अग्निशमन प्रमुख श्री सुनील माळी आणि त्यांच्या टीम यांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे,


Share

Other News

ताज्या बातम्या