अतिरिक्त आयुक्तांनि १०० फुटी रस्त्यात लक्ष घालून सामाजिक कार्यकर्त्या समवेत पहाणी करावी : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/03/2024 7:24 PM

सांगली प्रतिनिधी : सांगलीमध्ये सुरू असलेल्या शंभर फुटी म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्गाचे पंधरा कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून सुरू असलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या विरोधात लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आवाज उठवला जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याने आजही लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी स्वतः शंभर फुटी रस्त्याची पाहणी केली.यामध्ये त्यांना रस्त्याची लेवल नसल्याचे तसेच वापरले जाणार जाणारे मटेरियल दर्जेदार नसल्याचे त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण पाच पाच फुट रस्ता खोदून ठेवलेला आहे .त्यावर फुटपाथ बनवण्याची योजना असेल तर ते काम का केले नाही असा सवालही मनोज भिसे यांनी केला आहे .शिवाय हा रस्ता अनेक ठिकाणी आरला गेल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांना निदर्शनास आले आहे .तर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या ड्रेनेज होलला व्यवस्थितपणे लेवल केली नसल्याने त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे नव्यानेच रुजू झालेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सदर शंभर फुटी रस्त्याची पाहणी करून या ठिकाणची परिस्थिती जाणून घ्यावी अशी मागणीही मनोज भिसे यांनी केले आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या