येणारे नवीन आयुक्त चांगले काम पुढे नेतील हीच अपेक्षा : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/03/2024 1:23 PM

कही खुशी कही गम.....
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त तीन उपायुक्त यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत मनपा इतिहासात पहिल्यांदाच एका वेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आणि त्या ऐन मार्च एंड मध्ये 
सर्वात महत्वाचे म्हणजे आता कुटे प्रशासकीय राजवट सेठ होत होती 
शहरातील महत्वाचे पाणी पुरवठा,रखडलेली ड्रेनेज योजना,शेरीनाला एच टी पी प्लांट,अन्य वेगवेगळी कामे काही प्रमाणत सुधारली जात होती 
मा.आयुक्त सुनील पवार यांनी या पूर्वी मनपा मध्ये उपायुक्त म्हणून काम केलेला अनुभव पाठीशी असल्याने त्यांना आयुक्त म्हणून काम करताना सर्व माहिती होती त्यामुळे कामे करताना प्राधान्य क्रम माहिती होता
मात्र अचानक बदली झाल्याने मनपा नियोजनात फरक पडणार आहे असे दिसते
साहेबांचा कार्यकाळ पूर्ण झाला पाहिजे होता बरीच कामे मार्गी लागली असती

केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी आणलेले 76 कोटी रुपयांचा निधी मुळे शहरातील प्रमुख रस्ते सध्या पूर्ण होताना दिसत आहेत

 तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चांगल्या
 पद्धतीने मार्गी लावला आहे

सिने अभिनेता सयाजी शिंदे यांना घेवून कचरा डेपो मध्ये झाडे लावण्याचे व त्याचे संगोपन करण्याची योजना कायम स्वरुपी लक्ष्यात राहील 

तसेच एच टी पी प्लांट साठी पाठपुरावा सुधा केला आहे

तसेच अधिकारी कर्मचारी यांचे टीम वर्क चांगले झाले होते

असो मात्र जरी आपली बदली झाली असली तरी आपण सांगली जिल्ह्यातील सुपुत्र असल्याने आपल्या शहरावरील प्रेम असेच राहावे अशी विनंती आहे
व नवीन येणाऱ्या आयुक्त साहेब यांना अपूर्ण राहिलेल्या कामा तुमच्या अनुभवाने  आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आपण कराल ह्या बाबतीत शंका नाही
तसेच उपायुक्त रोकडे साहेब हे सुधा चांगले रुळले होते सर्वांशी अगदी मिळून मिसळून काम करण्याची पद्धत चांगली होती

त्याच पद्धतीने स्मृती पाटील यांनी सुधा चांगले काम केले आहे कोणत्याही कामात झोकून देऊन काम करण्याची त्यांची पद्धत वाकण्या जोगी आहे 

परत एकदा आपण सर्वांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये सेवेत यावे अशी आशा बाळगत आहोत 
धन्यवाद आपण दिलेल्या योगदान बद्दल
काहींना सादर पोस्ट आवडेल नाही आवडेल माहिती नाही मात्र प्रत्येक बाबतीत आरोप प्रत्यारोप शक्य नसतात असे माझे वयक्तिक म्हणंने आहे 

आणि नवीन येणारे आयुक्त चांगल्या पद्धतीने अपूर्ण राहिलेल्या कामा बाबतीत चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे त्यांना चांगल्या कामात नेहमी सहकार्य राहील तसेच चुकीच्या कामाला विरोध राहील.

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच 

Share

Other News

ताज्या बातम्या