*काँग्रसने मिळवून दिलेले स्वातंत्र्य व घटना धोक्यात - अँड. रामहरी रूपनवर पाटील*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 27/03/2024 11:23 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

दहिवडी दि:काँग्रसने देशाला मिळवून दिलेले स्वातंत्र्य आणि घटना सध्या धोक्यात असून ते वाचवण्यासाठी आज आपण ताकदीने उभा राहायला पाहिजे असे आवाहन ऍड. रामहरी रुपनवर पाटील यांनी केले. सातारा-लातूर महामार्गावरील खांडसरी चौकातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित माढा लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार,काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, अशोक गोडसे, एम.के.भोसले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रुपनवर म्हणाले की,
काँग्रेसने स्वातंत्र्य आणून घटना निर्माण केली. ते सगळ धोक्यात आले असून स्वातंत्र्य वाचवण्यासाठी काँग्रसने जबाबदारीपूर्वक विचार करायला पाहिजे. यामध्ये आगामी निवडणुकांमध्ये आपण महविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत सांगितले. इंडिया आघाडी पडली तर देशाचे भविष्य धोक्यात आहे. इंडिया आघाडीला मोठ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. असे सांगितले. त्याचबरोबर राजकारणात सगळ्यांना मोठ व्हावं वाटत. दुसऱ्याला मोठ म्हणणारा आपोआप मोठा होतो. दुसऱ्याला छोटा केलेला माणूस राजकारणात आतापर्यंत मोठा झालेला नाही असा सल्ला दिला. त्यामुळे आपण सर्वांना मोठ म्हणायला शिकल पाहिजे. माढा लोकसभा मतदार संघात रणजित निंबाळकर पडणार हे नक्की असून आपण सर्वजण मिळून त्यासाठी प्रयत्न करुया,असे आवाहनही रुपनवर यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
रणजित देशमुख म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघाचा खासदार हा डबल खासदार कसा होतोय,तेच बघायचय. सुमारे ०३ लाख मतांच्या फरकाने या खासदाराला पाडून आपली ताकद दाखवून देऊया. जेवढी लागेल तेवढी ताकद लावून रणजित निंबाळकरांना या निवडणूकीत पाडायचच आहे, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. रणजित देशमख यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताच 'माढा अन रणजित निंबाळकरांना पाडा' अशी घोषणा दिली. 


लोकसभेनंतर राज्यात उद्भवलेली राजकीय परिस्थिती पूर्ववत होईल!
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांना त्यांचं घड्याळ आणि उद्धव ठाकरेंना त्यांचा धनुष्यबाण परत मिळेल. सगळे आमदार अपात्र ठरविण्यात येतील, असे भाकीत रामहरी रुपनवर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या