खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने बोंबाबोंब करून आमदाराचा जयकुमार गोरे यांचा निषेध केला

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 26/03/2024 10:07 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

दहिवडी दि:पाणी प्रश्नावर आता तालुका पाणी संघर्ष समिती आक्रमक!
खटाव माण तालुक्यात तारळी योजनेचं पाणी सोडा!
पाणी वाटपाचा दुजाभाव करणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा शिमगा ठोकून केला निषेध!
मागील 1 महिन्यापासून खटाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये भीषण पाणी व चारा टंचाई आहे. पाण्याचे टँकर कमी पडत आहेत.
खटाव तालुक्यातील १६ व माण तालुक्यातील २४ गावे अशी ४० गावे तारळी प्रकल्पावर अवलंबून आहेत.अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येरळा तलावात पाणी नाही. पाणी टंचाई वर लोकप्रतिनिधी व प्रशासन गांभीर्याने विचार करत नाही.या पाणी प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता टोलवाटोलवी ची उत्तरे देत आहेत.
मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत याविषयी पाणी संघर्ष समितीची चर्चा होणार आहे. मात्र सद्यस्तिथीत खटाव आणि माण तालुक्यात पूर्ण दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने तारळीचं पाणी त्वरित देवून दुष्काळाची दाहकता कमी करावी अन्यथा पाणी प्रश्न पेटणार असून पुन्हा मोठी आंदोलने करावी लागतील असा इशारा तालुका पाणी संघर्ष समितीने वडूज ता खटाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे,राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ महेश गुरव,सरपंच योगेश जाधव,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर इंगवले आदींनी पाणी वाटपात जाणूनबुजून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या कडून दुजा भाव होत असल्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने शिमगा करून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी
खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने बोंबाबोंब करून आमदाराचा जयकुमार गोरे यांचा निषेध केला

Share

Other News

ताज्या बातम्या