चामोर्शी पोलीसांनी केला बनावटी देशी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 25/03/2024 8:29 PM


 
    गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी  1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत  आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.  पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.
त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.  त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत. 
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे.                                                                  
                                                                   ।।।।।।।।।।।।।।।।

Share

Other News

ताज्या बातम्या