श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न...*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 12/02/2024 6:51 PM

*श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न...*

     शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसंबंधित विविध विषयांवर पालकांशी विचारविनिमय करण्यात आला व त्याचबरोबर नूतन वर्षाची पालक शिक्षक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य भरत सपकाळे तर समितीच्या उपाध्यक्ष पदी कु. आदित्य कस्तुरे या विद्यार्थ्यांचे पालक श्री. गणेश परशराम कस्तुरे (रा. भगूर) यांची निवड करण्यात आली.या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख मा. डॉ. मृत्युंजय कापसे सर होते. उपस्थित सर्व पालकांचे स्वागत प्रा. सूरज गंगावणे आणि प्रा. अश्विनी ठाकरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूनम मगर यांनी दैनंदिन महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा, विद्यार्थ्यांची शिस्त, पालक व शिक्षक म्हणुन असलेली जवाबदारी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अश्विनी ठाकरे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या प्लेसमेंट्स यांबद्दल पालकांना सविस्तर माहिती दिली. प्रा. पूनम रेस्वाल यांनी पालक व विद्यार्थी यांतील नाते अजून चांगल्या प्रकारे सुदृढ व्हावे, त्यांच्यामधील सुसंवाद वाढवा असे मत प्रतिपादन केले. उपस्थित पालकांमधून श्री गणेश कस्तुरे यांनी पालक म्हणून आपली असलेली जवाबदारी व सौ.हिरा भांगरे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व पालकांचे असलेले योगदान याबद्दल आपले मनोगत मांडले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. पूजा भांगरे हिने या कार्यक्रमप्रसंगी पालक व शिक्षक यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ. मृत्युंजय कापसे यांनी पालक- शिक्षक मेळाव्याचे उद्दिष्टे व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आपली पालक व शिक्षक म्हणून असलेली दुहेरी भूमिका मांडली. या संपुर्ण कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता जोशी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजू सानप यांनी केले. सरतेशेवटी प्रा. सूरज गंगावणे यांनी सर्व उपस्थित पालक व शिक्षक वर्गाचे आभार मानून सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या