पेंढरी येथे महात्मा ज्योतीराव फुले स्मूतीदिनानिमीत्य समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहामत साजरा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 28/11/2023 8:00 PM

  प्रतिनिधी पेढरी :प्रशांत पेदापल्लीवार                       

धानोरा:तालूक्यातील पेढरी  येथे दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोज मंगळवारला महात्मा ज्योतीराव फुले स्मृतीदिनानिमीत्य माळी समाजाच्या वतीने माळी समाज प्रबोधन कार्यक्रम   साजरा करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यावरील छताचे बांधकाम पूर्ण झाल्याचे औचित्य साधुन छताचे अनावरन पवनजी व्ही.येरमे सरपंच ग्रामपंचायत पेंढरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तसेच महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्याला व सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्याच्या जिवनात केलेल्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातुन माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले.आणी जेवनाची व्यवस्था करण्यात आले.                       
                    सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन मोहूर्ले माळी समाज पेंढरी,उद्घ्घाटक पवन व्ही.येरमे सरपंच पेंढरी,तसेच उपस्थित प्रमुख पाहुने नरेश आतला गाव भुमिया,.पांडुरंगजी मोहूर्ले गाव पाटील, सी.के. खुणे साहेब सचिव ग्रा.प. पेंढरी, सौ.लक्ष्मीताई आतला उपसरपंच पेढरी,पवार सर मुख्यघ्यापक आश्रमशाळा पेंढरी,कालिदास लेनगुरे, प्रमोद गावळे,डोमाजी लेनगुरे ,शत्रुघ्न येरमे त.मु.अ. पेंढरी,सोमाजी कावळे पेकीनमुडझा,गुराखी सोनुले घोडाझरी,दादाजी आदे दोळंदा,मंजुषा पवार,वनिता आतला,मंदा आतला,रुणिता गुरणुले,त्रुशाल येरमे,प्रशांत पेद्दापल्लीवार,चांगदेव मोहुर्ले,तसेच पेंढरी परीसरातील सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक,पेंढरी येथील माळी  समाजातील सर्व महिला व पुरुष प्रामुख्याने सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या