शामरावनगर मधील चिमुरडीच्या मृत्युसंदर्भात मनपाच्या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा : मनोज भिसे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2023 2:34 PM

मा.आयुक्त तथा प्रशासक ,
सुनील पवार सो                                 
 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका...


विषय:--शामराव नगरातील शोष खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीच्या मृत्यू संदर्भात कारणीभूत असणाऱ्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात.

महोदय ,
         सांगलीतील शामराव नगर मधील ज्ञानेश्वर कॉलनी शोष खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या चिमूरड्या तहूराच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनातील आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार जबाबदार असून,गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सांडपाणी निचऱ्याची समस्या असून याकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
       अधिकारी, मुकादम,स्वच्छता, कर्मचारी यांच्याकडून या समस्यांकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच ही घटना घडली असल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.त्याचबरोबर मृत्यू पावलेल्या मुलीच्या नातेवाईकांपैकी एकास महानगरपालिकेत नोकरीत सामावून घ्यावे.अशी मागणी मी आपणास या निवेदनाद्वारे करत आहे.मी केलेल्या मागण्यांचा आपण विचार करून कारवाई कराल ही अपेक्षा ! यावेळी शिवाजीराव पाटील उपस्थित होते 

कळावे                                     
आपला विश्वासू 
 ( मनोज भिसे.)

Share

Other News

ताज्या बातम्या