ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विकास कामात रेतीचा अडसर दूर व्हावा : प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे - कुरखेडा

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/4/2020 1:46:26 PM

कुरखेडा :- रेती अभावी नगरातील विकासकामे प्रभावित झाले आहेत प्रशासनाने विकास कामातील रेतीचा अडसर दूर  करावा अशी मागणी कुरखेडा नगरपंचायतचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी केली आहे
       कुरखेडा नगरपंचायतच्या वतीने संपुर्ण नगरात दहा कोटी रुपयांची विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून जवळपास दोन महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने समाजभवनाचे बांधकाम,नगरातील प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण, श्रीराम नगरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते,हनुमान मंदिर,साई मंदिर,स्मशानभूमीचे सौन्दर्यीकरण,  कब्रस्थान,इदगाह परिसराचे सौन्दर्यीकरण, आठवडी बाजारात सिमेंट रोड, अंगणवाडी बांधकाम, ईतर सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकामाचा समावेश आहे 
       ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मुख्य घटक असलेल्या रेतीची गरज आहे मात्र जवळपासच्या रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्व रेती घाट बंद असल्याने रेती अभावी कामे सुरू होऊ शकली नाहीत त्यामुळे नगरातील विकास कामांना ब्रेक लागलेला आहेही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी जवळपास हजार ते दीड हजार ब्रास रेतीची आवश्यकता आहे यातुल काही कामे सुरू न झाल्यास निधी परत जाण्याची संभावना आहे 
         यासाठी  प्रशासनाने पाच किमी परिसरातील एक घाट मंजूर करून याच कामासाठी संबधित कंत्राटदारांना अंदाजपत्रकानुसार आवश्यक असलेल्या रेतीचा स्थानिक पातळीवरून तहसीलदार, कुरखेडा यांच्या मार्फत तात्पुरता परवाना देऊन रेती उपलब्ध करून द्यावी यामुळे नगरातील विकास कामे पूर्ण होतील आणि लॉक डाऊनच्या काळात खाली बसलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळेल

नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)
9404231937

Share

Other News