उंबर्डे ग्रामस्थांचा उरमोडी पाटबंधारे विभागा विरोधात आंदोलनाचा इशारा

  • अतुल पवार (गुरसाळे)
  • Upadted: 31/07/2020 11:27 PM

उंबर्डे ग्रामस्थांचा उरमोडी पाटबंधारे 
 विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा
उरमोडी कॅनल हा  उंबर्डे गावच्या हद्दीतून गेला असून या कॅनॉल साठी अनेक शेतकऱ्यांची जमीन प्रशासनाने अधिग्रहण केलेली आहे  परंतु  अद्याप काही शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यात काही शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे जगण्याचे साधन दुसरे कोणतेही नसून ते सध्या रोजगार करून उदरनिर्वाह करत आहेत उरमोडी कॅनल चे काम काही दिवसापासून चालू आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्या कामावर अनेक वेळा नागरिकांनी तोंडी व लेखी तक्रारी केलेले आहेत परंतु या संदर्भात अद्याप उरमोडी पाटबंधारे विभागाकडून कोणतीही कारवाई ठेकेदारावर झालेली नाही उंबर्डे गावातील खोत वस्ती येथून कराड रोडला जाणारा पुलाचे काही दिवसांपूर्वीच बांधकाम केलेले आहे आणि हा फुल गेल्या सहा महिन्या पूर्वी खचला आहे  या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे या पुलावरून अनेक वेळा वाहने कॅनल मध्ये गेली आहेत अनेक वेळा नागरिकांना इजा  झाली  आहे त्याची तक्रार उरमोडी पाटबंधारे विभाग ला ग्रामस्थांनी वारंवार करून सुद्धा अद्याप कुणीही त्या संदर्भात कारवाई केली नाही जर भविष्यात  त्या पुलावर कोणता अनुचित प्रकार घडून  कोणत्या नागरिकाला  काही झाल्यास  त्यात   सर्वस्वी जबाबदार उरमोडी पाटबंधारे विभाग  व ठेकेदार  यांना धरले जाईल म्हणून उंबर्डे ग्रामस्थांनी उरमोडी पाटबंधारे विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करून येत्या तीन दिवसात पुलाचे काम व्यवस्थित पूर्ण  केले नाही तर ग्रामस्थ मिळून आंदोलन करणार आहेत असा इशारा ग्रामस्थ पोपट बचाराम पवार माजी सरपंच भानुदास पवार शिवनाथ पवार बाळासो पवार यांनी दिला आहे

Share

Other News

ताज्या बातम्या