श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या समारोप प्रसंगी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते ' देवदूत ' ही उपाधी देण्यात आली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/04/2023 9:49 AM

नांदेड :- वसमत येथील शेकडो शिवभक्तांच्या साक्षीने श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या समारोप प्रसंगी मानवतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे 
धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते ' देवदूत ' ही उपाधी देण्यात आली असल्यामुळे ठाकूर यांना मिळालेल्या पुरस्काराची संख्या ८१ झाली आहे.गेल्या आठवड्यापासून  वसमत येथील बालाजी मंदिर परिसरात नागेश महाराज विभुते यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. वसमत चे नागरिक दवाखान्यासाठी नांदेड येथे आल्यानंतर वेळोवेळी दिलीप ठाकूर यांनी जेवणाचे डबे, रक्ताच्या बाटल्या देऊन मदत केली असल्यामुळे व त्यांच्या जगवेगळ्या अखंडीत सेवा कार्याबद्दल ' देवदूत ' ही उपाधी देण्यात येत असल्याची माहिती सुखानंद महाराज यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, कर्मयोगी,दीनबंधू सेवा पुरस्कार,नांदेड के सांता, शान ए नांदेड,इन्स्पायर पर्सनालीटी,आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी  सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड,  अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार,  तिरंगा गौरव पुरस्कार,लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड,कृतज्ञता सेवेचा पुरस्कार ,राजरत्न पुरस्कार , संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता यासारखे अनेक पुरस्कार देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. कोरोना लॉकडाउनच्या  काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन २२ संस्थांनी कोरोना योद्धा  हा पुरस्कार देऊन कौतुकाची थाप मारली आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई,पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या असल्याचे सुखानंद महाराज यांनी सांगितले.त्यानंतर कुमार अभंगे यांनी धीरगंभीर आवाजात मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर नागेश महाराज, श्रीरंग मुंजाळ महाराज,नारायण तिळकरी,किशन इमडे,श्रेयस कदम, सुधाकर  रोकडे,एल. एम.सातपुते यांच्या हस्ते देवदूत स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन दिलीप ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी आपण  देवदूत वगैरे कोणी नसून एक सामान्य नागरिक असल्याचे प्रतिपादन केले. दररोज आपल्या हातून एक तरी सेवा कार्य घडावे असा ध्यास घेतला असून देवदूत उपाधी मुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी साहित्य व  पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कुमार अभंगे, समाजसेवेत अग्रेसर असल्याबद्दल शिवा सुरेश लोट, छायाचित्रणात चांगले कार्य करणारे धनंजय कुलकर्णी व धार्मिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या संध्या संदीप छापरवाल यांचा श्री शिवकृपा सन्मानपत्र देऊन  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अतिशय व्यवस्थित सूत्रसंचलन माजी उपप्राचार्य  किशनराव इमडे यांनी  तर आभार नितीन कदम यांनी मानले. यानंतर वसमत शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. महाप्रसादानंतर सप्ताहाची सांगता झाली. दिलीप ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन  आता पर्यंत त्यांना ८१ पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या