*पळशीत वाळू चोरीप्रकरणी एकावर कारवाई*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 24/01/2023 10:43 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
प्रतिनिधी:दहीवडी 

         दी:पळशी ता.माण येथे माण तहसीलदारांच्या पथकातील गोंदवले बु।येथील मंडलाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी सोमवारी पहाटे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.
         सोमवारी पहाटे मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्जुन खाडे यांच्या मालकीच्या एम.एच.११ डी.ए. १२०८ या ट्रॅक्टरवर अनधिकृत वाळू वाहतूक करताना पहाटे गोंदवले बु।च्या मंडलाधिकाऱ्यांनी छापा मारत सदरची कारवाई करत ०१ लाख १३ हजार २००रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
        वाकी ता.माण येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर महसूल प्रशासन थंडावले होते.त्यानंतर प्रथमच गोंदवले बु।चे मंडलाधिकारी जागे झाले.त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कारवाई केली. यामुळे छुप्या वाळू चोरांना हा दणका मानला जात असून यापुढेही अशा स्वरूपात वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई होत राहणार का? असा सवाल या कारवाईनंतर बोलत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या