आवाहन

BREAKING NEWS

जिहेकटापूरचा बोगदा अखेर पुर्ण माण खटाव मधील २७हजार ५०० हेक्टर क्षेञाला होणार लाभ

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 9/30/2022 10:11:02 AM


आर टी आय न्यूज नेटवर्क
दहिवडी प्रतिनिधी :प्रतिनिधी
माणवाशीयांची लवकरच प्रतिक्षा पुर्ण होणार.

   माण खटावला वरदान ठरणारी जिहे कटापूर योजना आणी माणसाठी अडसर असणारा तब्बल १४ किलोमीटरचा बोगदा अखेर पुर्ण झाला आहे.
आता काॕक्रीटीकरणाचे काम राहीले आहे ते पण लवकरच त्या  सुरु होत आहे त्या  मुळे माण तालुक्याचे लवकरच स्वप्न साकार होणार आहे.
    कायम दुष्काळी म्हणून माण तालुक्याची गणना होत होती १९९५ साली युतीचे सरकार आले तत्कालीन मुख्यमंञी मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली त्यातून माण तालुक्याला टेंभू उरमोडी व जिहे कटापूर योजना मंजुर झाल्या त्या पैकी टेंभू व उरमोडीचे पाणी माण तालुक्यात येऊ लागले माञ त्याचा जास्त गावाला फायदा होत नव्हता .

तालुक्याला वरदान ठरणारी 
जिहे कटापूरची योजना सुरुवातीला अवघी २५० कोटीची होती त्या नंतर योजना रखडल्याने या योजनेवर खर्च वाढू लागला ही योजना १५०० कोटीवर जाऊन ठेपली राज्य सरकार कडून एवढा मोठा खर्च होणे शक्य नव्हते या साठी या योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाल्यास ही योजना गतीने पुढे जाणार होती २०१९ साली या योजनेला मान्यता मिळाली जवळपास ८०० कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
या कामाला गती आली खटाव तालूक्यातील नेर पर्यतचे काम पुर्ण झाले.
माण तालूक्यात पाणी यायचे म्हटले तरी तब्बल १४ किलोमीटरचा बोगदा हाच मुख्य अडसर होता. अनेक निवडणुकात पाण्यावरुन राजकारण तापायचे पाणी वर्षात येईल ६ महिन्यात येईल पण बोगदाच पुर्ण नव्हता 
गेली तीन चार वर्ष वेगाने बोगद्याचे काम दिवस राञ चालू होते शिरवली मधून वेटणे कडे व नवलेवाडी कडे वेगाने काम चालू होते दोन्ही बाजुने काम चालू होते काही ठिकाणी ९० फुट तर काही ठिकाणी ३३० फुटापर्यत हा खोल बोगदा होता याचे काम आता पुर्ण झाले आहे.

माण तालुक्यातील डोंगरावरची गांवे सोडली तर जिहे कटापूरचे पाणी हे माथ्यापासून माण गंगा नदीत सुटणार असल्याने अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे हे पाणी माण गंगा नदीवरील आंधळी धरणात सुटणार आहे या शिवाय या नदीवर असणारे सर्व बधारे भरुन ही नदी वाहती होणार होती निम्मा तालुका या योजनेने ओलीताखाली येऊ शकतो या शिवाय दहिवडी बिदाल आंधळी मलवडी टाकेवाडी परकंदी गोंदवले पळशी या मोठ्या गावासह पुर्वेकडील नव्याने ३२ गावाचा समावेश झालेल्या लोकांची पिण्याच्या पाणी सोय होणार आहे.


चौकट- वेटणे या ठिकाणी  थोडा बोगदा शिल्लक ठेवला असून या बोगदा पुर्ण पाण्याने भरला आहे काॕक्रीटीकरण करताना हे पाणी पंपीगने उपसावे लागणार आहे तसेच याच ठिकाणी ब्लास्ट करुन पाणी आंधळी धरणात सुटणार आहे


शिरवली येथील याच जॕकवेल मधून वेटणे व नवलेवाडीचा बोगद्याचा शेवटचा टप्पा पुर्ण झाला.

Share

Other News

ताज्या बातम्या