" पाऊले चालती पंढरीची वाट "
गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे आषाढी वारी दिंडी सोहळा होऊ शकला नाही पण या वर्षी हि परंपरा कायम राखताना सांगली ज़िल्हा परिषद सांगली यांच्या पाणी व स्वछता या विभागामार्फत संपूर्ण जिल्यात श्री संत गोरक्षनाथ दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे . या सोहळ्याचे वेगेळे पण जपताना या विभागाने भक्तिभावा सोबत लोकांमध्ये पाणी ,आरोग्य व स्वच्छता या संबंधीची माहिती जिल्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचावी या साठी लोकजागर शाश्वत स्वच्छतेचा हि जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.