ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे कलापथकांनी अर्ज सादर करावे


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 5/13/2022 9:34:39 PM• प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांचे आवाहन

रोहित बोंबार्डे
तुमसर भंडारा दि. 13 : आदिवासी विकास विभागाच्या योजनांची प्रसिद्धी व्हावी व सर्वसामान्य जनतेला योजनेची माहिती व्हावी, याकरिता कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी अनुसूचित जमातीच्या कला पथकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक कलापथकाने 25 मे 2022 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रस्ताव सादर करावे. प्रस्तावाचा अर्ज प्रकल्प कार्यालय, भंडारा येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.

कला पथकांना कार्यालयामार्फत नेमून दिलेल्या गावांमध्ये अटी व शर्तीच्या अधीन राहून योजनांची प्रसिद्धी करावी लागेल. तरी इच्छुक अनुसूचित जमातीच्या कलापथकाने प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.

Share

Other News