ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*वाघाने केली महिलेची हत्या*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/13/2022 8:45:47 PM

आरमोरी:शेतात काम करत असतांना वाघाने हल्ला करुन महिलेस ठार केल्याची घटना आज दिं 13 मे रोजी सकाळच्या सुमारात आरमोरी तालुक्यातील अरसोडा शेतशिवारात घडली.नलुबाई बाबुलाल जांगडे (35) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्तमाहितिनुसार,नलुबाई ह्या रोजच्या प्रमाणे स्वताच्या शेतात काम करण्याकरिता सकाळच्या सुमारात गेल्या.यावेळी दब्बा धरुन बसलेल़्या वाघाने नलूबाईवर हल्ला केला यात नलूबाई यांच्या मृत्यू झाला.घटनेची माहीती होताच नांगरिकांनी  घटनास्तळाकडे धाव घेतली घेतली असता नरभक्षक वाघ तीथेच दब्बा धरुन बसला होता व आरडाओरडा केल्यानंतर त्याने तीथून जंगलाच्या दिशेने घुम ठोकली असे प्रत्यक्षदशी ने सांगीतले आहे नलुबाई यांच्या मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे.सदर घटनेमुळे परिसरात दहशद पसरली आहे.

Share

Other News