ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*बाळासाहेबांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/13/2022 7:20:38 PM

            मुंबई, दि. 13 :- प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून संजीवनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

००००००००


 

Share

Other News