ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गडचिरोली जिल्हयात आज 108 कोरोनामुक्त, नवीन 201 कोरोनाबाधित


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/19/2022 5:52:47 PM



गडचिरोली,(जिमाका)दि.19: आज गडचिरोली जिल्हयात 925 कोरोना तपासण्यांपैकी 201 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 108 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32147 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30565 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 831 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.59 टक्के तर मृत्यू दर 2.34 टक्के झाला आहे. 

    आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 95, अहेरी तालुक्यातील 21,आरमोरी तालुक्यातील 04, भामरागड तालुक्यातील 29, चामोर्शी तालुक्यातील 21, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 08, मुलचेरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 05, सिरोंचा तालुक्यातील 05, आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 108 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 18, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 04, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 01, सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01,मुलचेरा तालुक्यातील 01, आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे.
*****

Share

Other News