ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामासाठी मिरज सुधार समिती करणार आमरण उपोषण...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/27/2021 4:15:22 PM**मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात.....
***डॉ. बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनादिवशी होणार आंदोलन...

        मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मिरज शहर सुधार समितीने पुन्हा आक्रमक भुमिका घेतली आहे. रस्ता दुरूस्तीबाबत समितीने संबधित विभागाकडे समन्वयातून मार्ग निघत नसल्याने आता समितीचे कार्यकर्ते 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनादिवशी महात्मा गांधी चौकात आमरण उपोषणास बसणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यासाठी सुधार समितीने गेल्या सहा वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. सुमारे 10.800 किमी रस्त्यासाठी 27 कोटींचा निधी मंजूर होऊन 24 कोटींची निविदा मंजूर होउâन ठेकेदार सुध्दा निश्चित झाला आहे. केंंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे उद्घाटनही होऊन प्रत्यक्ष कामाला कोठेच सुरूवात झाल्याचे दिसत नाही. रस्ता रूंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि विद्युत खांब स्थलांतरित करणे आदी कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि महावितरण कंपनी एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत असल्याने मिरज शहर सुधार समितीच्या विनंतीनुसार मा. आ. सुरेशभाऊ खाडे यांनी दि 29 ऑक्टोबर 2021 रोजी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात संबधित विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन जबाबदारी निश्चितही करण्यात आले होते.
तरीही, महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका जबाबदारी निश्चितीवरून कागदी घोडे नाचविण्याचेच प्रकार सुरू आहेत.  तर, रस्त्यावरून जाताना नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. मात्र, याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाला नसल्याचे दिसते.  म्हणून समिती पुन्हा आक्रमक भुमिका स्विकारली आहे. समितीचे अध्यक्ष शंकर परदेशी यांच्या नेतृत्वाखाली असिफ निपाणीकर, जहीर मुजावर, अफजल बुजरूक, बाळासाहेब पाटील,  राकेश तामगावे, अक्षय वाघमारे यांच्यासह अन्य सदस्य  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी महात्मा गांधी चौक येथे महात्मा गांधी पुतळ्याखाली आमरण उपोषणास बसणार असल्याचे समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष संतोष माने उपस्थित होते.

Share

Other News