ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

भावी पिढीवर संस्कृतीचे संस्कार रुजविणे गरजेचे* शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांचे प्रतिपादन


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 10/25/2021 9:41:55 PM

*भावी पिढीवर संस्कृतीचे संस्कार रुजविणे गरजेचे*                                                                         शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांचे प्रतिपादन  
   पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत सण उत्सव साजरे करतांना आपली संस्कृतीचे संस्कार आपोआपच पुढील पिढीवर होत असत मात्र विभक्त छोट्या कुटुंबांमुळे मुलांना सणाचे महत्व लक्षात येत नाही त्याकरता भावी पिढीवर हे संस्कार रुजविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष व विश्व हिंदू परिषदेचे प्रांतपाल एकनाथ शेटे यांनी केले.     शिक्षण मंडळ संचालित भगूर येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी दीपावली सणाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी एकनाथ शेटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड, विशाल शिरसाठ, जीवन गायकवाड, मुख्याध्यापिका उषा परदेशी, प्रसाद आडके आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सणातील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा यमद्वितीया व भाऊबीज या सणांविषयी शिक्षिका सुनंदा गायखे,मीना गोजरे यांनी  कसे केले जातात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानिमित्ताने मातीपासून साकारलेल्या 'राजगड' किल्ल्याची माहिती सुरेखा कानवडे यांनी दिली. प्रमुख पाहुणे  व विद्यार्थी एकत्र येत विविध प्रकारच्या फटक्याची आतिषबाजीने केली पाहुण्याच्या हस्ते १० शालेय विद्यार्थ्यांना नवीन गणवेश वाटप करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन अनुपमा वालझाडे तर आभार सुजाता शिरसाठ यांनी मानले. यशस्वीतेसाठी तृप्ती पावशे, रंजना सोनवणे,निवृत्ती तुपे, आनंद कस्तुरे, सोपान सहाणे,जुईली शेटे,नलिनी देशमुख,शीला सोनवणे,रुपाली शहाणे आदींनी परिश्रम घेतले.

Share

Other News