ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नगरसेवक अभिजीत भोसले " बेस्ट नगरसेवक महाराष्ट्राचा" पुरस्काराने सन्मानीत ...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/24/2021 7:27:44 PM        माझे महापूर काळातील काम, कोरोना च्या दोन्हीही लाटा मध्ये केलेले काम, अंकली नाला खुला करणे, घर टू घर लसीकरण अभियान, स्टोर्म वॉटर डिसपोजल साठी प्रयत्न, कोविड सेंटर, लहान मुलांचे कोविड सेंटर, प्रभागातील विकास कामे, अपघात ग्रस्ताना केलेली मदत, अभ्यासिका, वाचनालय, उद्यानह्यासारखी कामे,पायाभूत सुविधा करता लॉकडाऊन काळातील दीड महिना केलेलं अन्नदान, बेडसाठी मदत, दोन दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी व इतर बरेच काही अशा पद्धतीने संपूर्ण कामातून आजवर मी माझा प्रभाग असो किंवा प्रभागाबाहेरील कुणी असो सामोरे गेलोय, प्रयत्न केला आहे, त्याचेच फळ मला नेहमीच सकारात्मक मिळत आले आहे. त्यामागे तुमच्या सर्वांचेच आशीर्वाद आणि प्रेम उभे राहिले आहे
      आणि आज मला सांगायला आनंद होतोय की आज मला लोकसत्ता संघर्ष सेवा संस्था यांचे वतीने "बेस्ट नगरसेवक महाराष्ट्राचा" अशा पुरस्काराने संस्थेने सन्मानीत केले. त्यासाठी मी संस्थेचा आभारी आहे.
     सोबतच माझ्यावर विश्वास टाकून ज्यांनी मला संधी दिली ते माझे नेते मा राज्यमंत्री विश्वजित कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या वेळोवेळी दिलेल्या सपोर्ट मुळे हे शक्य होतेय. सोबतच पक्ष नेते म्हणून आमच्या नेत्या जयश्री वाहिनीसाहेब पाटील, अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील, अध्यक्ष आमदार विक्रम दादा सावंत यांनीही वेळोवेळी विश्वास ठेऊन संधी दिली आहे.
     आपल्या ह्या शहरातील सारे नागरिक बंधू भगिनी, माझे प्रभागातील नागरिक ज्येष्ठ,माता,बंधू भगिनी सोबतच माझ्या आख्या मित्र परिवाराच्या आशीर्वादाने हे शक्य झालेय. ह्या साऱ्यांचा मी कायमच ऋणी राहील.

नगरसेवक,
अभिजित भोसले

Share

Other News