मंडप उभारणीचे सूचनापत्र आले, पण परवानगीचे काय? मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी परवानगी मिळत नसल्याने खोळंबा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 15/06/2021 12:17 PM


( निलेश अडसूळ),

 मुंबई : गणेशोत्सव अवघ्या ९० दिवसांवर येऊनही मंडपांसाठी पालिका परवानगी देत नसल्याने मूर्तिकारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. 
पालिकेने परवानगीचे सूचनापत्र जाहीर करून महिना उलटला तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये परवानगी नाकारली जात आहे. 
परिणामी मूर्तिकारांचे काम रखडले असून पालिकाकार्यालयाच्या वाऱ्या ते करत आहेत.
 त्यामुळे आमची अडचण लक्षात घेऊन पालिकेने तत्परतेने परवानगी द्यावी, 
अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे. 
गणेशोत्सवाला तीन महिने बाकी असले तरी मूर्तिकारांसाठी हा कालावधी अत्यंत थोडका आहे.
 मंडप उभारणी, कच्च्या मालाची जुळवाजुळव, व्यवस्थापन, मागणीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी नमुना मूर्ती ठेवणे अशी पूर्वतयारी करावी लागते. 
परंतु पालिकेकडून अद्याप जागेची परवानगीच मिळाली नसल्याने सर्व कामे अडली आहेत.
 ‘परवानगी, ना हरकत पत्र यात अजून दहा दिवस जातील.
 पुढे मंडप उभारून तयारी करण्यात दहा-बारा दिवस जातील. 
मग जेमतेम ६०-७० दिवस आमच्या हाती राहतील.
 इतक्या कमी कालावधीत मूर्ती घडवणे, सुकणे, रंगवणे तापदायक होते,’ असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. 
‘गणेशोत्सव तोंडावर येऊन परवानगी मिळत नसल्याने आमची धांदल उडली आहे. 
पालिका कार्यालयात गेल्यावर वरिष्ठांकडून परवानगी आलेली नाही, 
अद्याप आदेश नाहीत अशी उत्तरे मिळतात.
 शिवाय माती आणि पी.ओ.पी. हा संभ्रम आहेच. 
मातीकामासाठी हा वेळ पुरेसा नाही. 
पालिकेने मूर्तिकारांचे हाल लक्षात घेऊन लवकर परवानगी द्यावी,’ 
असे लालबागमधील मूर्तिकार जयेश हाटले यांनी सांगितले. 
पालिकेच्या सूचनापत्रकात करोनास्थिती नियंत्रणात येताच परवानगी दिली जाईल,
 असे म्हटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या