ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

माजी प्रशासकीय अधिकारी राम खांडेकर यांचे निधन


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/10/2021 9:18:38 PM


 
नागपूर : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष कार्याधिकारी (ओ.एस.डी.) म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहिलेले आणि आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे राम खांडेकर यांचे रात्री दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले. 
ते ८७ वर्षांचे होते. 
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. 
यशवंतराव ते नरसिंह राव अशी सलग पाच दशके सत्तेच्या वर्तुळात प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
 गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. 
 मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 
अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

⭕लेखनकार्य......... 

खांडेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक दैनिकांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन केले. 
सार्वजनिक जीवनातील विस्तीर्ण अनुभवाच्या आधारे खांडेकर यांनी ‘लोकसत्ता’साठी साप्ताहिक स्तंभलेखन केले. 
हेच लेखन राजहंस पब्लिकेशनच्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले आहे.

 ⭕अल्पचरित्र… 

३ सप्टेंबर १९३४ मध्ये नागपूरला जन्मलेले रामचंद्र केशवराव उपाख्य राम खांडेकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोेकरीची सुरुवात नागपुरातूनच केली.
 १९५६ मध्ये झालेल्या भाषिक राज्याच्या निर्मितीमुळे खांडेकर यांची बदली त्या वेळच्या मध्य प्रदेशच्या नागपूर राजधानीतून मुंबईला झाली. 
१३ ऑक्टोबर १९५८ला त्यांची नियुक्ती द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मराठी स्टेनोग्राफर म्हणून झाली.
 नोव्हेंबर १९६२ला भारत-चीन युद्धाच्या वेळी यशवंतराव संरक्षणमंत्री झाले तेव्हा त्यांनी खांडेकर यांना दिल्लीला नेले.

Share

Other News