मनपा सुरू करणार १२० ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पीटल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/04/2021 11:35 AM







        सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सांगली महापालिका प्रशासनाने तातडीने 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी या जागेची पाहणी केली. मिरज पॉलिटेक्निक येथे कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 21 एप्रिल पूर्वी हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. यावेळी उपायुक्त  राहुल रोकडे, मनपा आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष राहुल दादा पवार तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या