वनधन विकास केंद्राचे महाग्रामसभा कार्यालय कोरची येथे दोन दिवसीय प्रशिक्षण

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 27/02/2021 6:17 PM

कोरची :- 

          जनजातीय कार्य मंत्रालयाच्या अधीन असलेल्या ट्राईफेडने प्रधानमंत्री वनधन योजने अंतर्गत स्थापित केलेल्या वनधन केंद्राचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक २० फरवरी २०२१ ते दिनांक २५ फरवरी २०२१ पर्यंत महाग्रामसभा कार्यालय,कोरची येथे घेण्यात आले.या दरम्यान कोरची तालुक्यातील मुख्यः बोडेना,साल्हे,भर्रीटोला या गावांचा समावेश असेलेले ‘रावपाट गंगाराम घाट वनधन विकास केंद्र',दोडके व अस्वलहुडकी गावातील ‘दंतेशिरो वनधन विकास केंद्र’,गहानेगटा गावातील‘कुवारपाट वनधन विकास केंद्र’ व कुकडेल या गावातील ‘समसेरगड वनधन विकास केंद्र’अश्या एकूण ४ केंद्राचा समावेश होता.योजनेची अंमलबजावणी महाग्रामसभा कोरची,आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ,गडचिरोली यांच्या कडून होत आहे.आदिवासी उद्योगाचे मूल्यवर्धन, वन उत्पादनाचे ब्रांडिंग व बाजारपेठ हा उद्देश ठेऊन उद्योजकता आणि कौशल्य विकास (ESDP) प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. लोकपंचायत संस्था,संगमनेर येथून आलेले प्रशिक्षक यांनी फार उत्तम प्रकारे गटा मार्फत घेण्यात आलेल्या कार्यामध्ये या भागात असलेले गौण वनउपज ते त्यावरील आधारित प्रक्रिया उद्योग इत्यादी विषयांला प्रशिक्षणामध्ये वाचा फोडली. गडचिरोली भागात मोह,टोरी, हिरडा, बेहडा, चारोळी इत्यादी गौण वनउपज मुभलक प्रमाणात असून येथील आदिवासींची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. या गौण वनउपजावर वनधन केंद्रामार्फत प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे पुढे चालून उद्योग निर्मिती होऊ शकते. प्रशिक्षणात प्रत्येकी वनधन विकास केंद्राचे एकूण २५ सदस्य उपस्थित असून सामाजिक अंतर,मास्क व सॅनिटायझर इत्यादी बाबींना लक्षात घेऊन हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात महाग्रामसभेचे पदाधिकारी, संस्थचे कार्यकर्ते यांची मोलाची भूमिका होती.






आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944

Share

Other News

ताज्या बातम्या