विष्णु अण्णा खरेदी- विक्री संघाची ५८ वीं वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/02/2021 10:30 AM



    दरवर्षी सलाबादप्रमाणे ह्यावर्षी देखील कोरोनाचे शासन नियमानुसार काटेकोर पालन करून आज विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघाची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपल्या नेत्या मा.श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सां.जि.म.बँकेचे संचालक मा. सिकंदर जमादार सर,मा. शंकरबापू पाटील,मा.विश्वासबापू पाटील,मा.अरविंदभाऊ पाटील, सर्वोदय शिंक्षण मंडळाचे कार्यवाह मा.आनंदराव काका पाटील,हाऊसिंग फायनान्सचे माजी उपाध्यक्ष.मा.सुभाषदादा यादव,संस्थेचे माजी चे.मा. रावसाहेब पाटील,मा.इंद्रजित पाटील,व मा.जंबूअण्णा चौगुले,व आदी मान्यवर तसेच संस्थेचे आजी-माजी चेअरमन,व्हा चेअरमन,संचालक,शेतकरी, सभासद,सेवकवर्ग या सर्वांच्या उपस्थितीत खेळिमेळीत पार पडली.
      यावेळी संघांचे चेअरमन मा.संग्रामदादा पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले व  प्रास्ताविका मध्ये आपल्या संघाच्या कामकाजाची सर्व माहिती देऊन संस्थेच्या नफ्यात कशा पद्धतीने भर देता येईल अशा सर्व योजना सभासदांसमोर मांडल्या व सभासदांनीही त्यांना पूर्ण पाठींबा दिला.
    यावेळी सर्व मान्यवरांनी चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळाच्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले.
   मॅनेजर म्हसकर साहेब यांनी सर्व प्रोसेडींग वाचून सादर केले,व विविध विषयावर चर्चा झाली....यावेळी संस्थेचे सर्व संचालकमंडळ,सभासद,कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या