नॅशनल करीअर ॲकॅडमी फलटण चे अभूतपूर्व यश सदानंद शिंदे ची गगनभरारी........

  • महादेव कळसे (Kelgao)
  • Upadted: 23/11/2020 5:26 PM

     प्रतिनिधी, राजकुमार काळे (दि.23 नोव्हेंबर)

     मौजे अजनी तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील सदानंद महादेव शिंदे हा मुलगा भारतीय सैन्यात दाखल झाला असून त्याचे मित्र परिवार,गावकरी त्याचे सर्वत्र कौतुक करत आहेत.
            लातूर जिल्हा हा नेहमीच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जातो आता सैनिक क्षेत्रातही आघाडीवर आहे.....
 
             अतिशय गरीब कुटुंबांमध्ये जन्मलेल्या सदानंदने अगदी दहावीपासूनच सैन्यामध्ये जाण्याची इच्छा असल्यामुळे तो सतत प्रयत्न करत होता. आणि त्याच्या प्रयत्नाला आज यश आले असून तो आज भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले आहे. वडील दुसऱ्याची सालगडी म्हणून काम करून आपला मुलगा भारतीय सैन्यामध्ये दाखल व्हावा अशी त्यांची इच्छा सदानंद ने पूर्ण केली.  
             नॅशनल करिअर अकॅडमी फलटण चे संचालक कुमार परदेशी ,रवींद्र कोलवडकर अवचित ताटे, यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यश संपादन केले आहे असे सदानंद शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्या आठवणी सांगत असताना सदानंद शिंदे यांचे डोळे पाणावले. मी केलेल्या कष्टाला आज फळ मिळाले असेही तो म्हणाला.
               जीवनामध्ये खूप सुख दुःखाचे प्रसंग येत असतात त्यामध्ये हा एक माझ्या आठवणीतील सुखाचा प्रसंग आहे. माझे मित्र सचिन कोळी,प्रदीप सूर्यवंशी तसेच नॅशनल करिअर अकॅडमी फलटण येथील रवींद्रनाथ कोलवडकर व त्यांचे सहकारी राजकुमार काळे यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी आज हे यश प्राप्त केला आहे असे सांगितले.
               नॅशनल करिअर अकॅडमी फलटण चे रवींद्र कोलवडकर यांना संपर्क केला असता त्यांनी आमच्याजवळ आलेल्या मुलांना त्यांच्या ध्येयप्राप्ती पर्यंत जाण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत करून आम्ही त्या मुलांचे स्वप्न साकार करत असतो असे सांगितले. आतापर्यंत बऱ्याच गरीब कुटुंबाच्या चुली पेटवण्याचे कार्य आम्ही केले आहे असे कोलवडकर यांनी सांगितले...

खोचक प्रश्न अचूक उत्तर कायद्याने.! www.bhartiyamahitiadhikar.com बातम्या साठी संपर्क करा

राजकुमार काळे
शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी
https://wa.me/9922473633

Official web site
www.bhartiyamahitiadhikar.com
Official email id

Share

Other News

ताज्या बातम्या