रेशन अधिकार म्हणजे काय..? रेशन कार्ड मिळवायचे कसे..?

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 31/10/2020 5:18 PM

कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर रेशनकार्ड आहे का अशी विचारणा केली जाते काहि कारणास्तव सवताचे रेशनकार्ड नसणे. रेशनकार्ड हरविणे. किंवा खराब झालेले बदलून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याचे समजले जाते पण योग्य कागदपत्रे योग्य ठिकाणी सादर केली तर हि प्रक्रिया अगदी साधी सोपी होऊन जाते सध्या रेशनकार्ड महिलांच्या नावावर मिळते त्यादृष्टीने रेशनकार्ड चे प्रकार किती आणि कोणते आणि नवीन रेशनकार्ड कसे मिळवावे
अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो
1/ प्राधान्य गटातील रेशनकार्ड धारक दारिद्र्य रेषेखालील 100/टक्के सहभाग असतो तर 44/ हजार रुपयांच्या आत उत्पादन असणारे गावातील एकूण लोकसंख्येच्या  76/टक्के लोकांना याचा लाभ मिळतो ग्रामिण भागातील प्रमाण हे 76/टक्के तर शहरी भागात प्रमाण  45/टक्के आहे 
  2. /. प्रधान रेशनकार्ड धारकांना   रु 2/ प्रमाणे किलो दराने गहू देण्यात येतो तर  3/ रु कीलो दराने तांदूळ दिला जातो त्याच बरोबर. 15 रु 81 पैसे दराने राकेल दिले जाते पांढरे रेशनकार्ड धारक व दोन गॅस धारकांना राॅकेल दिले जात नाही तर एक सिलेंडर असणार्या रेशनकार्ड धारकांना उपलब्ध प्रमाणे राॅकेल दिले जाते 
3. /. ग्रामिण भागात 76/टक्के लोकांना योजनेचा फायदा देणेचा अधिकार ग्रामसभेला आहे
  * नविन रेशनकार्ड कधी मिळते * रेशनकार्ड हरवले असेल तर
* दुबार रेशनकार्ड काढवयाचे असेल तर
*. रेशनकार्ड खराब झाले असेल तर
* कुटुंब विभक्त असेल तर
* रेशनकार्ड मध्ये नाव वाढवणे
* रेशनकार्ड मधून नाव कमी करणे
* व्यक्ती स्थलांतरित झाली असेल तर
   * रेशनकार्ड प्रकार *
* अंत्योदय रेशनकार्ड
* प्रधान गट रेशनकार्ड  44 हजार आतिल उत्पादन
* केशरी रेशनकार्ड  1 लाखाच्या आत अणि 44 हजार पेक्षा अधिक
* पांढरे रेशनकार्ड  1 लाखा पेक्षा जास्त उत्पादन असलेली व्यक्ती
   * आवश्यक कागदपत्रे * 
* तलाठी रहिवासी व उत्पन्न दाखला
*  लाईट बील घरफाळा पावती 
* घरमालकाचे संमती पत्र 
* प्रतिज्ञा पत्र ॲफेडेवहीट 
* सवयमघोषणा पत्र
*. धान्य दुकानदाराचे पत्र / अ/गट /क /गट  दाखला 
* आधार झेरॉक्स
* बॅंक पासबुक झेरॉक्स ‌व  लाभार्थी व्यक्ती चे दोन फोटो
   * नविन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे * 
* बाहेरून आलेले असल्यास 
बाहेर गावाहून आलेले असल्यास त्याठिकाणचा संबंधित सक्षम अधिकाराचा स्थलांतरचा दाखला रेशनकार्ड मूळ प्रत
* ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही*
रेशनकार्ड मध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञा पत्र   तलाठी रहिवासी दाखला. लाईट बील.  भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमती पत्र.  आधार झेरॉक्स. बॅंक पासबुक. व ज्या महिलेच्या नावाने रेशनकार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो 
  * विभक्त कुटुंब असेल तर *
वरिल कागदपत्राशिवाय विभक्त असल्यास सरकारी पुरावा उदा  घरफाळा. पावती. ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक‌ विभक्त राहत असल्याचे प्रमाणपत्र किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे 
  * रेशनकार्ड हरवले असल्यास *
पोलिस स्टेशनच्या रेशनकार्ड हरवलेचा दाखला आणि वरील सर्व कागदपत्रे
  * दुबार रेशनकार्ड काढावयाचे आसलेस *
रेशनकार्ड खराब. किंवा हरवले असल्यास दुबार रेशनकार्ड पुन्हा काढता येते हरवले तर पोलिस स्टेशनचा दाखला  खराब झाले असल्यास मूळ रेशनकार्ड प्रत जोडावी
  * नाव वाढवणे असल्यास. * 
मूळ रेशनकार्ड प्रत. नाव कमी करून आणलेचा संबंधीत अधिकाराचा दाखला   लग्नामुळे नाव वाढवणे आसलेस लग्नपत्रिका किंवा यादी पुरावा. विवाह नोंदणी दाखला. लहान मुलगा आसेलतर सहा वर्षांच्या आतिल मुलांसाठी जन्म दाखला. सहा वर्षांच्या वरिल मुलांसाठी जन्म दाखला आणि प्रतिज्ञा पत्र
  * नाव कमी करणे *
मयत दाखला किंवा लग्न झाले असल्यास लग्न पत्रिका किंवा यादी
  * स्थलांतरित होऊन आले आसलयास  *
ज्या कारणाने स्थलांतरित झाले आहे त्याचे सक्षम अधिकाराचा दाखला. रेशन विभागाकडून तपासणी चौकशी. व त्या नंतर कार्ड मिळते
*. रेशनकार्ड काढणे साठी तहसिलदार कार्यालयात येण्याची गरज नाही तर गावागावात असणार्या महा ई सेवा केंद्र हि सुविधा वापरा त्या ठिकाणी जावून वरिल कागदपत्रे सादर करावी नवीन रेशनकार्ड. नाव वाढवणे. नाव कमी करणे. मिळणयाचे काम होऊ शकते त्या ठिकाणाहून रेशनकार्ड तहसिलदार कार्यालयात येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबधीताची सहि झाले की रेशनकार्ड तयार होते 
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर वरिल प्रमाणे रेशनकार्ड संबंधीत माहिती व रेशनकार्ड काढणे साठी आमची मदत तुमच्यासाठी कायम तयार आहे कोणत्याही एजंटला फसू नका शासन व अधिकारी आपल्या सेवेसाठी व आपल्याला रेशनकार्ड काढणे साठी मार्गदर्शन करण्यासाठी कर्तव्य दक्ष पणे तयार आहेत त्यातून आपणास कोणतीही अडचण आल्यास खालील नंबरवर संपर्क साधा
कळावे आपला विश्वासू
अहमद नबीलाला मुंडे
9890825859
हुशार व्हा सक्षम व्हा
लाच देवू नका
अन्न सुरक्षा कायदा आपला कायदा
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पकेज अंतर्गत विना रेशनकार्ड धारक व परगावाहून मजूरीसाठी आलेले मजूर यांचे साठी सुध्दा रेशनकार्ड काढण्यासाठी असलेल्या कागदपत्रांच्या नियमाप्रमाणे बघू त्या गरिब मजूरांना रेशनकार्ड मिळतंय का  ज्यांनी आपली माहिती युनियनने मोफत तांदुळ वाटप सर्वे केला होता त्यावेळी नावे दिलेल्या लोकांनी संपर्क करा तुमच्यासाठी रेशनकार्ड मागणी करावयाची आहे.
जनहीथार्त.....

Share

Other News

ताज्या बातम्या