ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मुंबईची लाईफ सर्वांसाठी लवकरच.


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 10/29/2020 7:26:47 AM

लॉकडाऊन शिथिल होत अनलॉक-६ पर्यंत आलो तरीही मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा अद्याप सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानंतर महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी मिळाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नशिबी पुन्हा लोकल प्रवास कधी सुरू होणार याची चिंता मुंबईकरांना लागलेली असताना बुधवारी राज्य सरकारने खूशखबर दिली आहे.सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वेला देण्यात आला आहे. रेल्वेला एक पत्र देत राज्य सरकारने कोरोनासंबंधित नियमांचे पालन करत लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.

Share

Other News