गणितीयशास्त्रे संकुलाच्या २६ माजी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड : शिक्षण क्षेत्रात बजावणार महत्त्वपूर्ण भूमिका

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/09/2026 2:31 PM

नांदेड:-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या  गणितीयशास्त्रे संकुलातील २६ माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करीत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड मिळविली आहे. या यशामुळे संकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, हे विद्यार्थी भविष्यात शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती विविध जिल्हा परिषद, आदिवासी विभाग तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये झाली आहे. त्यामध्ये रुपाली शिंदे – जि.प. बुलढाणा, संतोष पांग्रेकर – जि.प. वाशिम, अजय मुलगीर – जि.प. नाशिक, विठ्ठल दांडे – जि.प. वाशिम, सूर्यकांत केंद्रे – जि.प. नाशिक, पांडुरंग काकडे – जि.प. वाशिम, कोमल मरकड – जि.प. पालघर, समाधान साबळे – आदिवासी विभाग, ठाणे, पल्लवी पाटील – आदिवासी विभाग, ठाणे, ज्ञानेश्वर धानवे – जि.प. वाशिम, पूजा रोकडे – जि.प. अहिल्यानगर, अक्षय सावंत – जि.प. सोलापूर, समृद्धी शिंगटे – जि.प. सोलापूर, रोहिणी दोईफोडे – जि.प. सातारा, पांडुरंग देशमुखे – आदिवासी विभाग, नाशिक, रामानंद काळे – जि.प. अमरावती, प्रणिता चालवड – जि.प. सोलापूर, भाग्यश्री चट्टे – आदिवासी विभाग, ठाणे, स्वाती हंकारे – जि.प. पुणे, राखी परवे – आदिवासी विभाग, नागपूर, दीप्ती वारे – जि.प. पुणे, शिवकन्या शिंदे – जि.प. पुणे, निकिता पारे – जि.प. पालघर, वर्षा राठोड – इंदिरा शिक्षण संस्था, मंठा, शैलजा गोसावी – स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि स्वाती राजे – जि.प. सोलापूर यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांनी गणितीयशास्त्रे संकुलातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून आता शिक्षक म्हणून भावी पिढी घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी हे शिक्षक मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन तसेच कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी सर्व यशस्वी माजी व विद्यमान विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी अध्यापन कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणितीयशास्त्रे संकुल परिवाराच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या उज्ज्वल व प्रेरणादायी अध्यापन कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या