आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
कोरेगाव दि:वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात वाठार पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागरिकांचे एकूण ६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास आणि सीईआयआर प्रणालीच्या माध्यमातून पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.
या कामगिरीमुळे आपले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत वाठार पोलिसांचे आभार मानले. सर्वसामान्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी वाठार पोलीस कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
"हरवलेला मोबाईल परत मिळणे म्हणजे नागरिकांसाठी मोठा दिलासा असून, वाठार पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि तांत्रिक कौशल्य कौतुकास्पद आहे," अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
सदरची मोहिम श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव, पोउनि. नितीन भोसले, पो. हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केलेली आहे.