आई-वडिलांची सेवा करणे सर्वात मोठे पुण्य आहे तीच खरी ईश्वर सेवा होय भागवत कथेत हभप गणेश महाराज करंजकर प्रतिपादन
भगूर वार्ताहर:- प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांना दैवत मानले पाहिजे आई वडील हे आपल्या मुलांना जीवनात चांगले संस्कार देतात आई-वडिलांचे सकारात्मक विचार प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे आणि प्रत्येक मनुष्याने मनोभावे आई-वडिलांचे सेवा केली पाहिजे हीच खरी भक्ती व ईश्वर सेवा होय हेच श्रीमद् भागवत कथेत सांगितले आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार, कथाकार,भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर यांनी भगूर येथील श्रीमद भागवत कथेप्रसंगी केले.
भगूर येथील सुप्रसिद्ध तुळसा लॉन्स येथे दि. ९ ते १५ जून पर्यंत भव्य भागवत गीता कथासार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चौथ्या दिवशीच्या कथासार कथेत करंजकर महाराज बोलत होते.यावेळी विविध प्रसंगात शंकर-पार्वती,नारद,नरसिंह,लक्ष्मी प्रभू भगवान राम,माता सीता,भगवान लक्ष्मण यासह विविध प्रसंगासह देवतांचे आगमन केले जात आहे.या भागवत कथेप्रसंगी केशव महाराज करंजकर, शिवराम महाराज बोराडे,राहुल महाराज सानप,प्रफुल्ल महाराज श्रावण,प्राध्यापक ललित महाराज भदे यांची अनमोल अद्यावत मंत्रमुग्ध करणारी अशी संगीत साद मिळत आहे. पुढे बोलताना करंजकर महाराज यांनी सांगितले की भागवत कथा श्रवण केल्याने निर्भयता प्राप्त होते मानवाचा उत्कर्ष होतो मानवाच्या जीवनाचे सार्थक होते मानवी जीवनाला यशस्वी अशी दिशा मिळते या कथेला सर्वच देव देवतांचा मोठा आशीर्वाद आहे या कथेमुळे जीवनाचं नक्कीच सार्थक होते हाच गुरु मंत्र आहे असेही समाज प्रबोधन करताना गणेश महाराज करंजकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिवसेना उपनेते विजय करंजकर,माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर,सोसायटी संचालक रंगनाथ करंजकर,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर,तुळसा लॉन्सचे संचालक संजय करंजकर,गटनेते शंकर करंजकर,नितीन करंजकर, सोसायटी संचालक संजय जाधव,सुरेश करंजकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सप्ताहभर चालणाऱ्या या कथेत दैनंदिन कार्यक्रमात सायंकाळी ६ ते ९ भागवत कथासार तदनंतर महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम असून भागवत कथासार कथेचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावाअसे आवाहन शिवछत्रपती तालीम संघ करंजकर गल्ली, वेताळबाबा मित्र मंडळ, भाग्योदय भजनी मंडळ मुरलीधर मंदिर व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे. भागवत कथेप्रसंगी महाप्रसादासाठी शिवसेना उपनेते विजय करंजकर,शरद पवार,संजय करंजकर,अमोल शिरसाट,मनोहर शेळके,राजेंद्र मुंदडा,सुनील करंजकर,भावसार,वेताळ बाबा मित्र मंडळ आदींचे अनमोल सहकार्य लाभले आहे.